👁 7 Views

डॉक्टरला साडेचार कोटींचा गंडा

 नागपूर : सोशल मीडियाचा प्रभावीपणे वारून करून युवकांना कमाईचा मंत्र देणारा प्रसिद्ध सोशल मीडियातज्ज्ञ अजित पारसे याने एका प्रतिष्ठित डॉक्टरला तब्बल साडेचार कोटी रुपयांनी गंडा घातल्याचे समोर आले आहे.


त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या झाडाझडतीत त्याच्या घरात अनेक बड्या राजकीय नेत्यांचे लेटरपॅड, विविध कार्यालयांचे शिक्के आणि बनावट कागदपत्रे आढळलीत. विशेष म्हणजे यात सदर पोलिस ठाण्याचा शिक्क्याचाही समावेश आहे. त्यामुळे अनेकजण अडचणीत येण्याची शक्यता आहे.


अजित गुणवंत पारसे (वय ४२ रा. स्वावलंबीनगर) असे आरोपीचे पूर्ण नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आपल्या प्रभावाचा वापर करून एका प्रसिद्ध डॉक्टरला हेरले. पंतप्रधान कार्यालयातून ‘सोशल कार्पोरेट रिस्‍पान्सिबिलीटी’ (सीएसआर) अंतर्गत निधी मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून दीड कोटी रुपये घेतले. दरम्यान काही महिन्यांनी डॉक्टर त्यांच्या मित्राने घेतलेल्या कर्जात हमीदार होते.

ही माहिती अजित पारसे यांना मिळताच, त्याने डॉक्टरला केंद्रीय अन्वेषण ब्युरोचा (सीबीआय) वॉरन्ट पाठविला. नंतर स्वतःच ही केस मॅनेज करण्यासाठी पुन्हा दीड कोटी रुपये उकळले. पैसे घेतल्यावर काही दिवसात वॉरन्ट कॅन्सल करण्यात आल्याचेही बनावट पत्र पाठविले. एवढेच नव्हे तर पारसे डॉक्टरांच्या नातेवाईकांकडे एका कार्यक्रमात गेला होता. तेथे नातेवाईकाने एक मुलगा दत्तक घेतल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे पारसेंनी डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीला बनावट नोटीस पाठवून आरोपी केले. हे प्रकरण निस्तारण्यासाठी पुन्हा दीड कोटी रुपये घेतल्याची बाब समोर आली.


ब्लॅकमेलिंगला कंटाळून डॉक्टरने अखेर कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ते गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान पारसेने शहरातील आणखी एका डॉक्टरची अशीच फसवणूक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे पारसेला अद्याप पोलिसांनी ताब्यात घेतले नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *