👁 7 Views

धक्कादायक, स्मशानभूमीत मृत महिलेच्या पोटातून काढले नवजात अर्भक

 मध्य प्रदेशातील जबलपूर येथील पानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ महिन्यांच्या गरोदर नवविवाहित महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.


तिच्या अंतिम दर्शनासाठी सासरच्या मंडळींनी स्मशानभूमी गाठली. त्याठिकाणी सफाई कामगाराला बोलावून त्याच्याकडून मृत गर्भवतीचे पोट ब्लेडने चिरले आणि गर्भासह बाळाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिथे उपस्थित लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. आता हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचलेल्या गौराबाईंनी तक्रार केली की, तिची मुलगी राधाबाई हिचे लग्न 24 एप्रिल 2021 रोजी पानगर येथील रहिवासी गोपी पटेल यांच्याशी झाले होते. लग्न झाल्यापासूनच मामाकडून बाईक व इतर साहित्य आणण्याची मागणी होत होती. सासरचे लोकही तिला त्रास देत असत. ती आठ महिन्यांची गरोदर होती. दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी अचानक राधाबाईंचे निधन झाले. याप्रकरणी पानगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 17 सप्टेंबर रोजी सासरच्या लोकांनी राधाच्या मृत्यूची माहिती पालकांना दिली होती. त्यानंतर लगेचच अंतिम संस्काराची तयारी करण्यात आली. दरम्यान राधाच्या सासरच्यांनी सफाई कामगाराला बोलावले. सफाई कामगाराच्या ब्लेडने राधाचे पोट कापले आणि गर्भ काढण्याचा प्रयत्न केल. गर्भ कापून बाळाचा मृतदेह वेगळा करण्यात आला. यानंतर राधावर जेथे अंत्यसंस्कार करण्यात आले, तेथे मृत अर्भकाचा मृतदेह बाजूला गडण्यात आला.


या संपूर्ण घटनेचा सुमारे दोन मिनिटे दोन सेकंदांचा हा व्हिडिओ समोर आला आहे. हाच व्हिडिओ घेऊन राधाची आई गौरा आणि तिची बहीण पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहोचले.  हा व्हिडीओ ज्या कोणी पाहिला त्याची तारांबळ उडाली. अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पानगर पोलिस सासू-सासऱ्यांचे जबाब नोंदवत आहेत. गरज पडल्यास पुरलेल्या अर्भकाचा मृतदेह बाहेर काढून तपास करता येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. तपासात समोर आलेल्या तथ्यांनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *