👁 4 Views

गरिबीने लेकरं झाली पोरकी , आधी पत्नीचा आणि नंतर स्वतःचा चिरला ब्लेडने गळा

 आर्थिक तंगीतून पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून करून पतीनेही स्वत:चा ब्लेडने गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात घडली आहे.


घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही सीतासावंगी इथं शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सरिता सुरेश बोरकर (37) असं पत्नीचे तर सुशील नीलकंठ बोरकर (वय 45) असं पतीचे नाव आहे. सुशील बोरकर हा अंडी विक्रीचा व्यवसाय करीत होता.



तर सरिता ही आशा सेविका म्हणून आरोग्य विभागात कार्यरत होती. काही दिवसांपासून सुशील हा आर्थिक विवंचनेत सापडला असल्याची माहिती आहे. गुरुवारी रात्री सुशील आणि सरिता एका रूममध्ये तर दोन मुले दुसऱ्या खोलीत झोपी गेले होते. सकाळी साडे सहा वाजता मुले शाळेत जाण्याकरिता निघाली.

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तपास सुरू केला असता आतून दार बंद असल्याने बाहेरून कुणी व्यक्ती खोलीत येण्याची शक्यता नव्हती. तसंच खोलीत एक ब्लेड आढळून आल्याने पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून करून सुशिलनेही त्याच ब्लेडने आपला गळा चिरुन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सुशीलचे ब्लेडने बोट चिरलेले आढळून आले याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *