👁 10 Views

मैत्रिणीच्या घरी येऊन तिच्याच आजीला संपवलं

 गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातील अनेक घटना तर अशाही असतात, ज्यात अतिशय क्षुल्लक कारणावरुन एखाद्याची हत्या केली जाते.


अशीच एक हादरवणारी घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. यात चोरीच्या उद्देशाने मैत्रिणीच्या घरी आलेल्या एका तरुणीने मैत्रिणीच्या आजीची हत्या केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. 


तरुणीने 80 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केली. तुळजाबाई सुर्यभान गोस्वामी असं 80 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिलेची हत्या करणारी ही आरोपी मुलगी मृत महिलेच्या नातीची मैत्रीण होती. ही मुलगी चोरी करण्याच्या उद्देशाने मैत्रिणीच्या घरी आली होती.

चोरी करण्यासाठी ती लोखंडी कपाट फोडत असताना त्याचा आवाज झाला. यावेळी वृद्ध महिला तुळजाबाई यांना जाग आली. त्यांनी या मुलीला चोरी करण्यापासून अडवलं आणि विरोध केला. यावरुनच दोघींमध्ये हातापायी झाली.



यातच अल्पवयीन मुलीने वृद्ध महिलेची हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मुलीने घटनास्थळावरुन पळ काढला. कारधा पोलिसांनी आरोपी अल्पवयीन तरुणीला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *