अकोला जिल्ह्यातील अंबिकापूर शेतशिवारातील एका हॉटेलमध्ये चक्क गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज छापा टाकून मादक अमली पदार्थ गांजाची १० लहान झाडे आणि १२० ग्राम गांजा जप्त केला आहे.
अंबिकापूर शेतशिवारात असलेल्या एका हॉटेल परिसरात गांजाच्या लहान झाडांची लागवड केली. त्या ठिकणी गांजाची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली
. हॉटेलवर छापा टाकला असता त्या ठिकाणी मादक अमली पदार्थ गांजाची लहान १० झाडे आढळून आली. पोलिसांनी ती झाडे जप्त केली. पाच हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपी रोशन रामणारायन बामन (२५, रा. अकोट फाईल) याच्या जवळ आढळून आला. आरोपीविरुद्ध बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने केली.



