👁 3 Views

आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन नॅशनल अवॉर्ड : श्लेषा कारंडे यांना संविधान दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार प्रदान

Pandharpur Live News : आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन नॅशनल अवॉर्ड समारंभात गार्डी , ता. पंढरपूर येथील शिक्षिका श्लेषा कारंडे यांना संविधान दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान  करुन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोग अध्यक्ष एम. एन. वेंकटरमन यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच अनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय आयोग माजी अध्यक्ष सुरेखा लामतुरे यांच्या हस्तेही सत्कार करुन श्लेषा कारंडे यांचा गौरव करण्यात आला.

श्लेषा कारंडे यांनी मराठी साहित्य संमेलन, साहित्यिक क्षेत्रातील त्यांचे योगदान विद्यार्थ्यांसंदर्भात विविध समाज उपयोगी उपक्रम शैक्षणिक उपक्रम वाचन आवड,क्षेत्रात विद्यार्थ्यासंदर्भात समाजात निर्माण केलेली जागृती व  कमी कालावधीत अफाट साहित्य निर्मिती, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात उपस्थिती, तसेच अध्यक्ष पद प्रमुख पाहुणे पद भूषवलेले आहे, त्यांचे शिक्षक संघटनेतील योगदान अनेक सामाजिक प्रश्न संदर्भात समाजात जागृती निर्माण करणे या संदर्भात त्यांनी केलेले बहुमोल योगदान यामुळे त्यांना नवी दिल्ली येथे संविधान दिनानिमित्त झालेल्या संविधान भवन कार्यक्रमात बहुमान करण्यात आला. 

तसेच यावेळी त्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री खासदार नामदार नितीन गडकरी यांचीही भेट घेऊन सांगोल्यातील राजकीय परिस्थितीवर विविध मागण्याचे निवेदन दिले. यावेळी पुणे शिक्षक मतदार संघातील माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे हे देखील उपस्थित होते.
..……………………………….
Pandharpur Live News
Youtube Channel Today’s News

………………….    ………….

 त्यांचे विद्या मंदिर हायस्कूल गार्डी , माननीय मुख्याध्यापक उत्तम कारंडे सर सर्व शिक्षक वर्ग,तसेच गार्डी ग्रामस्थ सरपंच श्री शिवकुमार फाटे, पंचायत समिती सदस्य सत्यवान देवकुळे तसेच महूद येथील सरपंच माननीय लुबाळ मॅडम , माझी डेप्युटी सरपंच, दिलीप नागणे, माजी सरपंच श्री बाळासाहेब ढाळे , समस्त महूद ग्रामस्थ,तसेच श्रीमती काशीबाई नवले बीएड कॉलेज कमलापूर, सांगोला येथील प्राचार्य माननीय पाटील सर , प्राध्यापक डॉक्टर शिवाजी जगताप सर, डॉक्टर नदाफ सर प्राध्यापक डॉक्टर माळी सर, डॉक्टर पाटील मॅडम प्राध्यापक गाडेकर सर प्राध्यापक महारनोर सर, डॉक्टर कांगडे मॅडम सिंहगड इन्स्टिट्यूट डायरेक्टर श्री नवले सर यांचेसह  अनेक मित्रमंडळी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देत कौतुक केले.

          महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागीय अध्यक्ष सुरेश राठोड सर माननीय सोमनाथ राठोड सर माननीय विनायक कुलकर्णी सर, बाळासाहेब शिंगाडे सर लातूरचे नेते माननीय मधुकर कुलकर्णी सर, पाटील सर यांनी फोनवरून अभिनंदन केले.

         मंगळवेढ्याचे नामवंत साहित्यिक लक्ष्मण हेंबाडे सांगोल्याचे साहित्यिक कृष्णा इंगोले सर तसेच अनेक महाराष्ट्रातील साहित्यिकांनी त्यांचे फोनवरून अभिनंदन केले साहित्य,हर्षदा गुळमीरे सुवर्णा तेली, विना होरा वंदना पाटणे, संगीता जाधव वनवास माची, वनवासमाची सरपंच महादेव माने यांनी त्यांचे फोनवरून अभिनंदन केले याबद्दल सांगोला परिसरात त्यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव होत आहे. पंढरपूर लाईव्ह न्युज परिवाराकडून त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *