👁 10 Views

चोरट्यांचा धुमाकूळ; भरदिवसा १३ तोळे दागिन्यांची चोरी

 घर बंद करून बाहेर कामानिमित्त जाणारी कुटुंबे असतील तर त्यांनी घरात मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. जेवढे दागिने, पैसे आवश्यक आहेत तेवढेच स्वत:कडे बाळगावीत.


दागिने सुरक्षित राहण्यासाठी लॉकर प्रक्रियेचा वापर करावा. तसेच अपार्टमेंटमध्ये वास्तव्य करणार्‍यांनी सीसीटीव्ही लावावेत व वॉचमन ठेवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


सातारा शहरातील पिरवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचा कडी- कोयंडा तोडून घरातून 5 लाख रुपये किमतीचे तब्बल 13 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना दि. 20 रोजी भरदिवसा घडली आहे. सातार्‍यात चोरट्यांची दिवाळी झाली असून या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


गणेश प्रकाश पवार (वय 34, रा. पिरवाडी, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 4 या कालावधीत घडली आहे. 

पवार दाम्पत्य सकाळी कामामिनित्त घरातून बाहेर पडले. दुपारी घरी आल्यानंतर कडी तुटलेली दिसली. आत जाऊन पाहून केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. तिजोरीची पाहणी केली असता त्यामधीलही साहित्य विखुरलेे होते.


या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर श्वान पथक, ठसे तज्ज्ञ पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता घरातून अडीच लाखाचे गंठण, एक लाखाचे नेकलेस, चाळीस हजारांचे झुमके, साठ पान 4 वर हजाराचे मंगळसूत्र, पंचवीस हजाराचे गंठण व मंगळसूत्र, दहा हजाराची अंगठी, तीस हजाराचे डायमंड मंगळसूत्र असा 4 लाख 96 हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांचा ऐवज चोरी झाला असल्याचे समोर आले. 

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाच्या अनुषंगाने परिसरात तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली. दरम्यान, चोरट्यांनी ऐन दिवाळीत बंद घरफोडी केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *