सोनं दुप्पट करण्याच्या आमिषाने एकाने जेष्ठ पथारी व्यावसायिक महिलेकडील दागिने घेऊन 95 हजारांचा गंडा घातला.
याप्रकरणी 62 वर्षीय महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी महिला गेल्या अनेक वर्षांपासून फडके हौद परिसरात पथारीवर ऋतूमानानुसार विविध वस्तूंचा व्यवसाय करतात.
२१ ऑक्टोबरला एका चोरट्याने त्यांच्याकडे येउन माझ्याकडे एक योजना आहे.
सोनं दुप्पट करून देण्याची बतावणी करून त्याने महिलेचा विश्वास संपादित केला.
त्यांच्यासोबत गप्पा मारून 95 हजारांचे मंगळसूत्र ताब्यात घेउन चोरटा पसार झाला.
याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करीत आहे.




