पंढरपूर
दिवाळीच्या पाडवा सणानिमित्त बडव्यांच्या मंदिरातील श्री विठ्ठलाला तिरुपती बालाजीचा पोशाख करण्यात आला आहे.
बालाजी आणि श्री विठ्ठल ही एकाच देवतेची दोन रुपे असली तरी या देवतांच्या मूर्तीमध्ये खूप मोठा फरक आहे. तथापि पंढरपूर मधील हरहुन्नरी कलाकार बालाजी महाजन बडवे या तरुणाने श्री विठ्ठल मूर्तीत हुबेहूब बालाजी साकारला आहे.
काळा मारुती परिसरात बाबासाहेब बडवे यांनी स्वतःच्या मालकीचे श्री विठ्ठल मंदिर स्थापित केले आहे.
शासकीय श्री विठ्ठल मंदिरात ज्या प्रकारे देवाची आराधना केली जाते त्यात पद्धतीने बडव्यांच्या मंदिरात पूजाअर्चा होत असते.
अलीकडच्या काळात पुरातन मंदिराबरोबर बडव्यांच्या मंदिरात भाविकांची वर्दळ वाढते आहे.
वाढती भाविकांची गर्दी आणि मागणी लक्षात घेवून दिवाळी सणाचे औचित्य साधून आज श्री विठ्ठलाला श्री बालाजी चा पोशाख करण्यात आला आहे. विठ्ठल बालाजीचे हे अनोखे रुप पाहून भाविक हरखून जात असून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.




