एका १६ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आहे. मुंबईतल्या आरे कॉलनीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली होती.
आरे कॉलनीमधील युनिट क्रमांत १५ येथील अखिलेश लोट यांच्या दीड वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता.
हल्ल्यात सोमवारी चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ईतिका असं त्या मुलीचं नाव होतं. ज्या परिसरात ही घटना घडली होती तिथून २०० मीटर अंतरावरुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केलं.
मागील काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्याने आरे कॉलनी परिसरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण होतं.
सोमवारची दुर्दैवी घटना घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती.
चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर वनविभागाने युनिट क्रमांक १५ ते आदर्श नगर परिसरात २२ सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. यासह दोन पिंजरेदेखील लावण्यात आलेले होतं. अखेर आज नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात अडकला.




