👁 6 Views

कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड, कर्मयोगी चे प्लेसमेंट मध्ये उल्लेखनीय यश

अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकत असलेल्या म्हणजेच 2023 सा पास आऊट होणाऱ्या कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी महाविद्यालयातील  

आणखी दोन विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असून त्यांना  प्रत्येकी चार लाखांचे पॅकेज मिळाले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. 


सँकी बिझनेस सोल्युशन प्रा. लि. या कंपनीने घेतलेल्या अंतिम निवड फेरीतून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातील साक्षी जत्राते यांची तर टाटा मोटर्स या नामांकित कंपनी मध्ये स्वप्नील साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.


 यांना प्रत्येकी चार लाखांचे पॅकेज मिळाले आहे. मागील काही दिवसापूर्वीच शेवटच्या वर्षामधील तब्बल बावीस विद्यार्थ्यांची सीआरटीडी या कंपनी मध्ये निवड होऊन त्यांना प्रत्येकी दहा लाखांचे पॅकेज मिळाले आहे. 

 विशेष महत्वाची बाब म्हणजे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होण्याधीच च विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड होताना दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे

. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत दिले जाणारे प्रशिक्षण हे कार्पोरेट क्षेत्रात नोकरी लागण्यासाठी अतिशय पूरक व उपयोगी होत आहे असे निवड झालेल्या विद्यार्थ्यानी आवर्जून संगितले. 


 श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट

 ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता प्रा. डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशिष जोशी, प्रा. धनंजय शिवपुजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. दत्तात्रय चौगुले तसेच सर्व प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *