कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही काळापासून अवैध धंदाच्या प्रमाणात वाढ झाल्याने
पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. खून, मारामाऱ्या, चोऱ्या यासारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे.
याचबरोबर जुगार अड्डे, अवैध दारू गावठी भट्ट्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दरम्यान यावर पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या माणगाववाडी येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्हयातील माणगांववाडी ( ता. हातकणंगले ) येथे चोरून अवैध रित्या गावठी हातभट्टीची दारू बनवली जायची. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पथकासह गावठी हातभट्टी दारुअड्डयावर छापा टाकण्यासाठी गेले होते.
यावेळी स्थानीक गुन्हे अन्वेषण पथकावर अवैधरित्या दारू उत्पादन करणाऱ्या 10 ते 15 अनोळखी इसमांनी पोलीसांवर हल्लाबोल केला.




