👁 8 Views

मंगळवेढा; हॉटेल मालकाने गैरफायदा घेवून ३५ वर्षीय महिलेवर केला अत्याचार

 

गैरफायदा घेवून तुझे फोटो नवर्‍यास व नातेवाईकास पाठवीन अशी 35 वर्षीय महिलेस धमकी देवून इच्छेविरूद्ध वेळोवेळी बलत्कार केल्याप्रकरणी परमेश्‍वर आनंदा कोळी (रा.बठाण) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत पोलिस सूत्रानी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी तथा पिडीत महिलेने बालाजीनगर येथे आरोपीची 20 गुंठे जमीन दि.21/9/2021 रोजी करार करून घेतली होती.


दरम्यान, या जागेत पत्राशेड मारून सदर पिडीतेने हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. पिडीत महिलेच्या पतीचा 2022 मध्ये अपघात झाल्याने ते त्यांच्या गावी आईवडीलाकडे रहावयास होते. हॉटेलचा व्यवसाय पिडीत महिला एकटीच सांभाळत होती.


या दरम्यान आरोपी हॉटेलवर सतत येत जात होता. त्यामुळे पिडीतेचे व आरोपीची चांगलीच ओळख झाली होती.

या दरम्यान पिडीतीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिला पैशाचे आमिष दाखवून हॉटेलचे भाडे थकल्यामुळे आरोपीने जबरदस्तीने सदर महिलेसोबत शारीरिक संबंध ठेव म्हणून भिती दाखवल्याने तीने नाईलाजास्तव रहात असलेल्या खोलीत आरोपीने बरेच वेळा शरीर संबंध ठेवले होते.


आरोपीने सदर पिडीतेस अनेक वेळा बाजार करणे व दवाखान्यास जाणे येणे साठी पैसेही दिलेले होते. या घटनेबाबत पिडीतेच्या पतीला व इतरांना काहीही सांगितले नव्हते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *