👁 6 Views

बसमध्ये जागा मिळवण्यासाठी तरुणीने लावली अशी युक्ती पाहून थक्क व्हाल

 

सार्वजनीक वाहनांमधून प्रवास करताना सीट मिळवणे हे फारच कठीण काम आहे. ही वाहानं जसं की ट्रेन, बस, मेट्रो हे आधीपासूनच भरुन येतात, त्यामुळे लोक आपली सीट पकडून ठेवतात.


ज्यामुळे उशीरा किंवा मागून चढणाऱ्या लोकांना सिट मिळत नाही, ज्यामुळे त्यांना संपूर्ण प्रवास उभं राहून करावं लागतं. मुंबई लोकल याचं एक उत्तम उदाहरण आहे. 


ज्या लोकांना सीट मिळत नाही त्यांची नजर सीट मिळवण्यासाठी खूपच आसूसलेली असते. पण त्याचा बऱ्याचदा काहीच फायदा होत नाही.

सध्या याच संदर्भात विदेशातील एक व्हिडीओ 
सोशल मीडियावरुन समोर आला आहे. ज्याला पाहून तुम्हाला हसू येईल. 


एवढंच काय तर तुम्हाला कदाचित हा व्हिडीओ पुढच्या वेळी सार्वजनीक वाहनातून प्रवास करताना कामी येईल. या व्हिडीओमध्ये एक तरुणी उभी असते.




जी आधी दिसताना साधी दिसत असते. परंतू काही वेळातच ती आपलं पोट असं काही फुगवते की ती जणु काही प्रेग्नेंट असल्यासारखीच वाटते. जी अखेर तिच्या स्वत:साठी बसमध्ये जागा मिळवते. जे पाहून जवळ उभ्या असलेल्या आजोबांचा चेहरा पाहण्यासारखा असतो.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *