👁 8 Views

महालक्ष्मी नगर येथे युवकाचा खून

 

भागात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबड गाव भागातील महालक्ष्मी नगर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणांमध्ये एका सराईतावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली दरम्यान पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयतांना अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचत अटक केली.


मयत गुन्हेगाराचे नाव अक्षय उत्तम जाधव (वय २१) आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे की . शुक्रवारी (दि.२८) रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान तन्मय मनोज गोसावी व आकाश अनिल साळुंखे हे महालक्ष्मी नगर येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर बसलेले असताना अक्षय उत्तम जाधव हा त्याच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला. 


यावेळी त्याचे वाद झाले असता संशयित तन्मय गोसावी याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने अक्षय जाधव यांच्या डोक्यात वार केला दरम्यान

 या ठिकाणाहून अक्षय स्वतःला वाचविण्यासाठी समोर असलेल्या घराच्या एका बाल्कनीत पळाला दरम्यान गोसावी व साळुंखे हे त्याच्या मागे पळाले व पुन्हा एकदा अक्षयच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याच्या डोक्यात दगड मारला दरम्यान या ठिकाणी 


असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने अक्षय ला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र संशयित हे त्याला मारतील या भीतीने तो पळून गेला दरम्यान त्याने अंबड पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली असता अंबड पोलीस ठाण्याचे पथक रात्री तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी जखमी अक्षय जाधव यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून पोलीस गाडीत बसवून जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अक्षयला तपासून त्यास मृत घोषित केले. 


दरम्यान या प्रकरणी संशयित मारेकरी तन्मय गोसावी व आकाश साळुंखे हे फरार होण्याच्या तयारीत असताना अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने त्यांना सापळा रचून तात्काळ अटक केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *