👁 7 Views

पंढरपूर सिंहगडच्या ३ विद्यार्थ्यांची “वालचंदनगर इंडस्ट्रीज” कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील ३ विद्यार्थ्यांची “वालचंदनगर इंडस्ट्रीज” कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.


  “वालचंदनगर इंडस्ट्रीज” कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील ऋतुराज विनोद कासार, अमोल प्रभाकर घाडगे, ऋषिकेश राजेंद्र कांबळे या ३ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन कंपनीकडून २.५८ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.


   “वालचंदनगर इंडस्ट्रीज” ही अवजड अभियांत्रिकी उत्पादने देणारी कंपनी आहे. ही कंपनी १९०८ साली स्थापन झाली असुन १०० हुन अधिक अभियांत्रिकी उत्कृष्टेतेचा वारसा पुढे नेत डब्ल्यू आय एल ने आपल्या ऑपरेशन क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम म्हणून नाव प्रस्थापित केले आहे. अशा या नामांकित कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील ३ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.


  अभियांत्रिकी शिक्षणात अल्पावधितच उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, उत्कृष्ट प्लेसमेंट आणि उत्कृष्ट निकाल मध्ये पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने  एक वेगळा ठसा उमटवून नावलौकिक मिळविला आहे. महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता सिद्ध करून जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.


 महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात दमदार वाटचाल केली आहे. सिंहगड  संस्थेतील शिक्षक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पद्धतीने ज्ञान दानाचे काम करीत आहेत. गुणवत्ता पुर्ण शिक्षण हेच सिंहगड संस्थेचे ध्येय आहे.


 विद्यार्थ्यांची कला ओळखुन शिक्षण देणाऱ्या पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधुन आज हजारो विद्यार्थी मोठ-मोठ्या जगातील नामांकित आय टी कंपनीत नोकरी करीत आहेत. या शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करून लाखोंची उलाढाल करत आहे. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षणप्रणाली मुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची सिंहगडला पसंती असून परफेक्ट इंजिनिअर सिंहगड मध्ये घडविले जातात. म्हणूनच आज सिंहगड महाविद्यालयातील मधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नामांकित आय टी कंपनीत निवडले जात आहेत.


“वालचंदनगर इंडस्ट्रीज” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख  प्रा. अनिल निकम, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *