पंढरपूर: प्रतिनिधी
आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक व्यवसायाने आपली संस्थात्मक रचना स्वयंचलित केली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक अथवा अन्य गोष्टीवर सायबर सक्सेस हि कंपनी काम करत आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील ११ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख
प्रा. अनिल निकम यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील आकाश भारत पिसे, क्षितिजा मनोज पुरवत,
संध्या उत्तम घाडगे, सौरभ बाळासाहेब लिंगे, निवेदिता शांतीनाथ बागल, सुप्रिया तुकाराम काशिद, रूतुपर्णा रणजित लावंड, शुभम दत्तात्रय मंगळवेढेकर,
स्नेहल वसंत पाटणे, प्राजक्ता पाटील, पल्लवी मिसाळ आदी ११ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.





