👁 6 Views

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना मिळाली ३.५० लाख पगाराची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी

“व्हिलस् इंडिया” ही कंपनी १९६० साली स्थापन झाली असुन कंपनीचे चेन्नई येथे कार्यालय आहे. ही कंपनी वाहतुक उपकरणांच्या निर्मितीमध्ये अग्रेसर आहे. 


अशा या कंपनीत कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय पंढरपूर येथील ३ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन “व्हिलस् इंडिया” कंपनीत निवड झाली असल्याची माहिती इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली.


   अल्पावधीतच एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.  नॅक ए ग्रेड प्राप्त करणारे जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय पंढरपूर सिंहगड ठरले आहे.


 याचबरोबर नुकताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त केला आहे. याशिवाय महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीची पदवी घेऊन उद्योग क्षेत्रात करिअर करीत आहे. 


शासकीय सेवेत ही पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील अनेक विद्यार्थी उत्कृष्ट पद्धतीने सेवा बजावत आहेत. याशिवाय महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या ४३५ हुन अधिक विद्यार्थ्यांना आय. टी. कंपनीत नोकरी मिळवून दिल्या आहे. पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये जापनीज भाषा ही मोफत शिकविली जाते. हि भाषा शिकविणारे पंढरपूर सिंहगड हे एकमेव इंजिनिअरींग काॅलेज आहे. 

अशा या महाविद्यालयातील प्राजक्ता उंबरकर, बाळू वाघमारे, अतुल लोंढे आदी ३ विद्यार्थ्यांची “व्हिलस् इंडिया” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून ३.५० लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.


  “व्हिलस् इंडिया” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *