👁 5 Views

उद्योजकाच्या मुलाचा मृतदेह निरा नदीत आढळला

 

सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक सुमेध शहा यांचा मुलगा साैमित शहा (वय २३) याचा शिरवळजवळील निरा नदीच्या पात्रात रविवारी सकाळी साडेआठ वाजता मृतदेह आढळून आला. 


ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबत शिरवळ पोलीस तपास करत असून, या घटनेची शिरवळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.


याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साैमित शहा (रा. पटेल चाैक, हायस्कूल रोड, सांगली) हा शनिवारी दुपारी चार मित्रांसोबत कारने पुण्याला गेला. 


रात्री साडेनऊ वाजता पुण्यातील एका हाॅटेलमध्ये सर्व मित्र जेवण करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी साैमितने मित्रांना पाच मिनिटांत येतो, असे सांगून तो कार घेऊन निघून गेला. तो बराच वेळ झाला आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याच्या सांगलीतील घरी या प्रकाराची माहिती दिली.


दरम्यान, नातेवाईकांनी रात्री उशिरा सौमितचा शोध सुरु केला. मात्र, तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी निरा नदीच्या पात्रात साैमितचा मृतदेह आढळून आला. 


यामुळे शहा कुटुंबीयांना याचा जबर मानसिक धक्का बसला. घटनास्थळी शहा कुटुंबीय तत्काळ पोहोचले. सांगली शहरात सुनील फ्लेक्स प्रिटिंग असा त्यांचा व्यवसाय आहे. साैमितच्या मृत्यूमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *