👁 4 Views

नांदायला येत नाही म्हणून पतीचं पत्नीसोबत भयानक कृत्य

 

नवरा बायकोमधील भांडण काही नवीन नाही. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नवरा बायकोमध्ये वाद होत असतात. अनेकदा हे भांडण जीवावर देखील उठतं. असाच एक प्रकार परभणी जिल्ह्यात घडला आहे.


पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने चक्क पत्नीच्या मानेवर ब्लेडने वार केले. या घटनेत पत्नी गंभीरित्या जखमी झाली आहे. 


शोभा चव्हाण असे जखमी महिलेचे नाव आहे. शोभा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सेलू पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा  दाखल केला आहे.


 रमेश नामदेव चव्हाण असं गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, शोभा आणि रमेश यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होते.


या वादामुळे शोभा या माहेरी राहण्यासाठी गेल्या होत्या. पती रमेश सतत भांडत असल्याने त्या सासरी येण्यास तयार नव्हत्या.

 दरम्यान, रविवारी रमेश हा पत्नीला आणण्यासाठी आपल्या सासरी गेला. नांदायला का येत नाही असे, म्हणत त्याने पत्नीच्या मानेवर ब्लेडने वार केले.


घटनेत पत्नी शोभा गंभीरित्या जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर आरोपी रमेश हा फरार झाला असून सेलू पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *