👁 7 Views

कर्मयोगीमधील सिव्हीलच्या सहा विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे, पंढरपूर अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल विभागामधील शेवटच्या वर्षा मध्ये शिकत असणार्‍या सहा


 विद्यार्थ्यांची कोलब्रो ग्रुप या कंपनीकडून निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.


कोलब्रो ग्रुप ही सिव्हिल अभियांत्रिकी क्षेत्रामधील नामांकित कंपनी असून या कंपनी मध्ये निवड झालेल्या योगेश काळे, प्रसाद काळे, बिरुदेव केसकर, सुमित बिराजदार, अभिषेख राठोड, राहुल धायगुडे या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन लाखांचे पॅकेज मिळणार आहे. 


दर वर्षी विविध बहुराष्ट्रीय कंपन्या कर्मयोगी अभियांत्रिकी मधील विद्यार्थ्यांची निवड करीत असतात. 

कर्मयोगीमधील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारे प्रशिक्षण अभियांत्रिकीच्या दुसर्‍या वर्षा पासून च दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्याधीच नोकरी मिळण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.


श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट


 ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पंचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले तसेच सर्व प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *