👁 8 Views

मुलाने मेकअप करत घातले मुलीचे कपडे अन् घरातील … अंगावर काटा आणणारी घटना

 

राजधानी दिल्लीत एका 13 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मुलाने महिलांचे कपडे घातले होते आणि चेहऱ्यावर मुलीसारखा मेकअप केला होता.


पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे प्रकरण दिल्लीतील नजफगढ भागातील असून 6 नोव्हेंबर रोजी नांगली साक्रवती परिसरात 13 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मूल दत्तक घेतले होते.


 मुल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी व्हिडिओ रील्स देखील बनवत असे. या प्रकरणात, पोलिस लैंगिक संबंधाच्या कोनातून म्हणजेच अनैसर्गिक लैंगिक संबंधातून देखील तपास करत आहेत.


घटनेच्या वेळी मुलाचे पालक बाजारात गेले होते, असे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे जात घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केलं आहे. 


या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी मुलाचे इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त केले आहे. त्यासोबत पोलीस आजूबाजूच्या शेजाऱ्यांचीही चौकशी करत आहेत.


पोलिसांचे म्हणणे आहे की, मुलगा सोशल मीडियावर खूप सक्रिय होता. तो व्हिडिओ बनवून पोस्ट करायचा. त्यामुळे त्याच्या गॅजेट्सची चौकशी सुरू आहे. या घटनेमागचे कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *