👁 8 Views

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज कंपनीकडून ४ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांना हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज कंपनीकडून ४ लाख पॅकेजची नोकरी मिळाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.


    महाविद्यालयातील काजल दशरथ पवार आणि साक्षी राहूल उपलाप यांनी हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज कंपनीत मुलाखत दिली होती. या मुलाखतीतून त्यांची निवड झाली असुन कंपनीकडून वार्षिक ४ लाख पगाराची नोकरी मिळाली आहे.


 अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होताच पंढरपूर सिंहगड मधील अनेक विद्यार्थ्यांना जास्त पॅकेज देणाऱ्या कंपनीमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये अनेक आय. टी. कंपन्या येऊन विद्यार्थ्यांची मुलाखतीतून निवड करतात. 


  आंतरराष्ट्रीय स्तरावरील नॅशनल कंपनीत पंढरपूर सिंहगडचा विद्यार्थी स्वतःचा ठसा उमटवून वेगळे व्यक्तिमत्व स्थापन करून आपले करिअर करीत आहेत.


चालू शैक्षणिक वर्षांत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील ४३५ हून अधिक विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत नोकरी मिळाली. अल्पावधीतच पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजने विद्यार्थी व पालकांचा विश्वास संपादन करून यशाचे शिखर पादाक्रांत केले आहे. 


“हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अनिल निकम, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *