👁 8 Views

गर्लफ्रेंडला भेटायला गेला घरच्यांनी पकडल्यानंतर जे झालं ते क्वचितच घडलं

 

रात्री चोरून प्रेयसीला भेटण्यासाठी एक प्रियकर गेला. पण प्रेयसीच्या घरातल्यांनी दोघांनाही रंगेहाथ पकडलं. यानंतर प्रेयसीच्या कुटुंबीयांनी जे केलं, ती कृती क्वचितच पाहायला मिळते.


चक्क दोघांचही अख्ख्या गावासमोर लग्नच  लावून दिलं गेलं. या लग्नाची चर्चा झाली नसती तरच नवल! ही घटना बिहारच्या मुझफ्फरपूरच्या एका गावात घडली. 7 नोव्हेंबर रोजी घडलेली ही घटना आता उघडकीस आली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.


7 नोव्हेंबर रोजी मुजफ्फरपूरच्या औराई प्रखंड भागातील खेतलपूर गावात एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटायला रात्री तिच्या घरी गेला. लपून छपून प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकर आणि प्रेयसीची भेट कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडली.


घरातील मुलीच्या प्रियकराला पकडल्यानंतर कुटुंबीय संतापले. प्रियकराला त्यांनी चोप दिला. नंतर त्याला बंदी देखील बनवलं. दिवसभर त्याला एका खोलीत डांबून ठेवण्यात आलं होतं. पण बघता बघात ही गोष्ट अख्ख्या गावात पसरली आणि गावातील लोकांनी पंचायत बोलावली.


गावच्या पंचायतीसमोर हा मुद्दा उपस्थित केला गेला. प्रियकर आणि प्रियसी एकाच जातीचे होते. दोघेही एकमेकांशी लग्न करण्यासाठी तयार आहे का, असं त्यांना विचारण्यात आलं. दोघांनीही होकार दिला. त्यानंतर लगेचच अख्ख्या गावासमोर तातडीने दोघांचं लग्न लावून देण्यात आलं.

प्रियकराला प्रेयसीच्या घरातल्यांनी कैद केल्याचं कळल्यानंतर गावातील लोकांनी तरुणाची सुटका केली. दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे दोन्हीकडील मंडळी लग्नासाठी तयार झाली असल्याचंही गावातील व्यक्तीने सांगितलं. गेल्या एका वर्षापासून या दोघांमध्ये प्रेम संबंध होते.


यातील प्रेयसीचं नाव काजल आहे. तिच्या कुटुंबीयांना तिच्या प्रियकराबाबत कल्पना होती. प्रियकरावर माझ खूप प्रेम आहे आणि आता आमचं लग्न झालंय. हा आनंद कशातच मोजता येणार नाही, असंही तिने म्हटलंय.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *