👁 10 Views

धक्कादायक; तरुणीचा गळा चिरला

 

    नवी दिल्ली – जबलपूरच्या रिसॉर्टमध्ये ज्या मुलीचा मृतदेह सापडला होता, तिची हत्या तिच्यासोबत राहणाऱ्या तरुणानेच केल्याचे समोर आले आहे. रिसॉर्टच्या खोलीतच तरुणाने गळा चिरला.


     त्याने एक व्हिडिओही बनवला ज्यामध्ये तो चादर काढून तरुणीला दाखवत आहे. पलंगावर रक्त आहे. मुलगी श्वास घेत आहे. व्हिडिओमध्ये हा तरुण बेवफाई नहीं करने का, असे म्हणत असल्याचेही दिसत आहे.


    हत्येच्या ४ दिवसांनंतर शुक्रवारी सकाळी या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या तरुणाने रिसॉर्टच्या रूम नंबर-५ मध्ये व्हिडिओ शूट केला आहे. 


    मध्ये तो रागाने म्हणतो, ‘बेवफाई नहीं करने का.’ यानंतर तो शिवीगाळ करत म्हणतो- ‘बेवफाई करणाऱ्यांचे नशीब असेच असते.’ व्हिडिओमध्ये पंजाबी गाणेही वाजत आहे.


    पोलिसांनी सांगितले की, २१ वर्षीय शिल्पा झारिया मंगळवारी जबलपूरमधील मेखला रिसॉर्टच्या एका खोलीत मृतावस्थेत आढळून आली.

     विशेष म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या ४ दिवसानंतरही तिचे सोशल मीडिया अकाउंट सुरू आहे. मंगळवारी आणि बुधवारी तिच्या इन्स्टाग्राम पेजवर काही फोटो अपलोड करण्यात आले. ते गुरुवारी हटवण्यात आले. थोड्याच वेळात पुन्हा २ नवीन फोटो अपलोड केले.


     यामध्ये हॉटेलच्या खोलीत तरुण-तरुणी दिसत आहेत. आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *