सोशल मीडियावर एका तरुणीचं विचित्र कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे.
व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहे. चित्रपटात दिसणारं दृश्य खऱ्या आयुष्यात दिसल्यावर नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
भर दिवसा खुलेआम या तरुणीने जे कृत्य केलं हे त्यानंतर तिची झालेली अवस्था पाहून यूजर्स निशब्द झाले आहेत.
तुम्हाला अभिनेता शाहिद कपूर अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेत्री आलिया भट्टचा उड़ता पंजाब हा चित्रपट आठवतो का? त्या चित्रपटात पंजाबमधील ड्रग्जचं वास्तव अधोरेखित करण्यात आलं होतं.
पंजाबमध्ये तरुणांना ड्रग्जने विळखा घातला आहे. याच भयान वास्तव सांगणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
तुम्ही पाहू शकता एक तरुणी भरदिवसा खुलआम आपल्या मांडीवर एक इंजेक्शन घेते आणि त्यानंतर तिची जी अवस्था होते तेव्हा पाहून आपल्या अंगावर काटा येतो.
त्या तरुणीने ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं आहे. पंजाबमध्ये काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री होते.





