👁 8 Views

8 कोटींच्या बनावट नोटा जप्त

 

महाराष्ट्रात ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने मोठी कारवाई करत ८ कोटी रुपयांच्या २००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही पालघरचे रहिवासी आहेत.


अद्याप अन्य आरोपी सापडले नाहीत त्यांचा शोध सुरु आहे. पोलीस सातत्याने तपासात गुंतले आहेत. छापलेल्या या नोटा नेमक्या कुणाच्या सांगण्यावरून छापण्यात आला याचा तपास पोलीस घेत असून, यातील काही नोटा बाजारात पाठवण्यात आळ्या आहेत का? याचादेखील तपास पोलीस करत आहेत 


असे किस्से अनेकदा सामोर येत असतात. काही दिवसांपूर्वीच, प्रयागराजमधून असाच एक प्रकार समोर आला होता, ज्यात STF (स्पेशल टास्क फोर्स) ने ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शहरातील मांडा रोड तिराहेजवळ काका-पुतण्याला बनावट नोटांसह अटक


 केली होती. त्यांच्याकडून प्रत्येकी १,९५,५०० रुपयांच्या पाचशेच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. चौकशीत या सर्व बनावट नोटा आंतरराष्ट्रीय तस्कर दीपक मंडल याच्या नातेवाईकाकडून आणल्याचे उघड झाले.


इस्लामपुरातील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत पैसे भरण्यासाठीच्या डिपॉझिट मशीनमध्ये टोळीकडून पैसे भरले जात होते. या डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा भरल्या जात होत्या.

 याप्रकरणी इस्लमापूर पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीच्या सांगलीतील घरावर छापा टाकला आणि या टोळीचा भांडाफोड केलाय. पोलिसांनी टाकलेल्या छापेमारीमध्ये ७.६६ लाख रुपयांच्य बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 


फक्त नोटाच नव्हे तर छपाईसाठी वापरण्यात येत असलेलं साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या कारवाईमध्ये बनावट नोटांचा छपाई कारखानाच पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *