Pandharpur | येत्या २० जानेवारी रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे मराठायोद्धा मनोज (दादा) जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा लाँग मार्च निघणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्याचे नियोजन करण्यासाठी मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे . या बैठकीत पंढरपूर येथे सोलापूर जिल्हा मुख्य समन्वयक माऊली (भाऊ) पवार, राजन (भाऊ) जाधव, प्रद्माकर (नाना) काळे, पुरुषोत्तम बर्डे व नागेश (काका) भोसले व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन व नियोजनासंदर्भात महत्वाची चर्चा होणार आहे.
तरी पंढरपूर शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.
स्थळ : संत श्री तनपुरे महाराज मठ स्टेशन रोड, पंढरपूर शनिवार दि. १३-०१-२०२४ रोजी सायं. ४:३० वा.
आयोजक : सकल मराठा समाज पंढरपूर शहर व तालुका


