👁 3 Views

वाढदिवसाची पार्टी मित्रासोबत जल्लोष , एक चूक भोवली अन् birthday लाच मृत्यु झाला

 

वाढदिवसाची पार्टी. मित्रांसोबत सेलिब्रेशन. मग घरी परतण्याची तयारी. आनंद आणि उत्साहाने भरलेला दिवस पण त्यात एक चूक भोवली आणि आयुष्य संपले. ज्याच्या घरात मुलाच्या बर्थडे पार्टीची वाट पाहत होते, तिथे त्याचा मृतदेह पोहोचला.


आनंदाच्या वातावरण शोक पसरला. एका चुकीनं हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं.

उत्तर प्रदेशातील शिवशंकरी धाममधील दीक्षितपूर गावात ही वेदनादायक घटना घडली आहे. 


वाढदिवसाची पार्टी करून घरी परतत असताना दीक्षितपूर ओव्हरब्रिज ओलांडताना एका टोकावरून दुसऱ्या टोकावर उडी मारताना हा अपघात झाला. ओव्हरब्रिजवरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. 


स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. या घटनेने तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी स्टंटबाजीचा प्रकार कायम होत असे. या तरुणानेही स्टंट करण्याच्या नादात हा अपघात झाला.


मिर्झापूर जिल्ह्यातील अदलहाट पोलीस स्टेशन हद्दीतील पचेगडा राजपूर, दीक्षितपूर येथील रहिवासी जयरामचा मुलगा धर्मेंद्र कुमार, वय २०, शनिवारी वाढदिवसाची पार्टी साजरी करून घरी परतत होता. मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर धर्मेंद्र घरी परतण्यासाठी निघाला होता. 


त्याच्या मित्रांनी त्याला कॉलेजजवळ सोडलं. मित्र निघून गेल्यानंतर धर्मेंद्रने कॉलेजमधून सायकल घेण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिजवरील पलीकडे उडी मारली.

 दुभाजकाच्या मध्यभागी उडी मारताना विद्यार्थी धर्मेंद्रचा तोल गेला. त्या पुलावर न जाता तो खाली पडला. पुलाची उंची सुमारे ६० फूट असल्याने तो खाली पडून जागीच ठार झाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *