👁 5 Views

लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार

 

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून अत्याचार करणाऱ्या तरुणाला क्रांतीचौक पोलिसांनी शनिवारी (ता.१२) सायंकाळी अटक केली. शुभम सोमीनाथ जाधव (वय २२, रा.


नागेश्र्वरवाडी) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याला १५ नोव्‍हेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए. एस. खडसे यांनी रविवारी (ता.१३) दिले. प्रकरणात १७ वर्षीय पीडितेच्‍या वडिलांनी फिर्याद दिली.


त्‍यानुसार १५ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्‍या सुमारास फिर्यादी व त्यांची पत्नी हे कामानिमित्त गेलेले होती. त्‍यावेळी पीडिता व तिची मोठी बहिण अशा दोघीच होत्‍या. 


दरम्यान पीडिता आईच्‍या धुणी-भांडीच्‍या कामावर जाते म्हणून घरातून गेली. मात्र, ती घरी परतलीच नाही. या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला आहे.


गुन्ह्याचा तपास सुरु असताना ११ नोव्‍हेंबर रोजी पीडिता स्वतः:हून पोलिस ठाण्‍यात हजर झाली. 

तिचा जबाब घेतल्‍यानंतर आरोपी शुभम जाधव याच्‍या विरोधात अत्याचार केल्याच्या प्रकरणात भादंवी कलम ३७६ (२) (एन) सह बालकांचे लैंगिक 


अपराधापासून संरक्षण अधिनियमाच्‍या कलम ६ अन्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागूल यांनी युक्तिवाद केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *