👁 6 Views

काळयाचे पांढरे करायला गेले आणि जाळ्यात अडकले

 

पैशांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या उपव्यवस्थापकानेच पदाचा गैरवापर करीत तब्बल दोन कोटींची रोकड साथीदारांच्या मदतीने एका कंपनीला देण्याचा प्रयत्न केला.


संबंधित कंपनीकडून चॅरिटेबल संस्थेच्या नावे अधिकची देणगी प्राप्त करून पैसे विभागून घेणे तिघांच्या अंगलट आले .


याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-4 ने तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन कोटींची रोकड जप्त केली आहे. बनावट नोटांची बातमी मिळाल्यानंतर कारवाईदरम्यान हा प्रकार समोर आला.


 काळ्याचे पांढरे करायला आले असताना तिघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. अमोल गोरखनाथ कंचार (वय 45, रा. औरंगाबाद), संतोष वैजनाथ महाजन (वय 43, रा. नाशिक) आणि सुशील सुरेश रावले (वय 34, रा. मंचर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रावले आणि कंचार हे मावसभाऊ आहेत, तर महाजन हा त्यांचा मित्र आहे.


आरोपी सुशील रावले हा (बँक ऑफ महाराष्ट्र, मंचर करन्सी चेस्ट, ता. आंबेगाव) येथे डेप्युटी मॅनेजर आहे. त्याने मंचर करन्सी चेस्टमधून दोन कोटींची रक्कम अनधिकृतपणे ताब्यात घेतली.

 रोकड एका खासगी कंपनीला देऊन त्यांच्याकडून सीएसआरची मोठी रक्कम अमोलच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या खात्यात घेणार होते.


ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, हरिश मोरे, संजय आढारी, प्रवीण भालचीम, विठ्ठल वाव्हळ, अजय गायकवाड, नागेशसिंग कुँवर, मनोज सांगळे यांनी केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *