Pandharpur: पंढरपूर शहराच्या गोविंदपुरा भागातील संभाजी महादेव जाधव यांचे सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी रात्री साडेअकरा वाजता पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 78 वर्षाचे होते.
(कै.) जाधव यांचे संपूर्ण बालपण हे पंढरपुरातील गोविंदपुरा परिसरात गेले. तदनंतर नोकरी निमित्त त्यांनी पंढरपूर सोडले. कोथरूड, पुणे येथे ते एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कार्यरत होते. अल्पशा आजाराने त्यांचे देहावसान झाले.
गोविंदपुरा, पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश जाधव यांचे ते चुलते होत. त्यांच्या पश्चात 1 मुलगा व 2 मुली व 6 पुतणे 6 पुतण्या व नातवंडे, सुना असा मोठा परिवार आहे.

