👁 5 Views

फरार बांधकाम व्यावसायिक अखेर जेरबंद

 याबाबत मनमिंदरसिंग तिर्थसिंग आनंद, वय 55 वर्षे, रा. औंध पुणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


द व्हिलेज रेसिडेन्सी, नेरेगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे या ठिकाणी आरोपी प्रतिक आगरवाल, रा. बाणेर, पुणे, किरण कुंभारकर, रा. हिंजवडी पुणे व विनय बोरीकर रहा हिंजवडी पुणे


 यांनी सदनिका विकत देण्याकरिता फिर्यादी मनमिंदरसिंग आनंद, वय 55 वर्षे, रा. औंध पुणे व इतर 35 ग्राहक फ्लॅट धारकांकडून मार्च 2018 रोजी रजिस्टर खरेदीखत करून देऊन विश्वास संपादन करून 4,14,27,491 ( चार कोटी 14 लाख 27 हजार 491) रुपये घेऊन प्लॉटचा ताबा न देता त्यांची फसवणूक केली आहे. 


असा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. तिघा आरोपींच्या विरोधात भादवि कलम 406, 420, 34 व मोफत कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पिंपरी-चिंचवड हे करीत आहेत.या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रतिलक आगरवाल राबाणेर पुणे याचा उच्च न्यायालय अटक पुर्व जामीन रद्द केला असताना सुद्धा तो हजर न होता पोलिसांना सुमारे दोन वर्षांपासून गुंगारा देत होता.

वरिष्ठांच्या आदेशाने या आरोपीच्या अस्तित्वाची माहिती प्राप्त केली असता कळाले की तो रांची, राज्य झारखंड व हैदराबाद या ठिकाणी बस्तान बसवत असल्याची माहिती तांत्रिक विश्लेषण द्वारे मिळाली

 तो पुणे रांची नागपूर अशा रेल्वे प्रवासात असताना रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांच्या मदतीने हतीया ते पुणे एस. एफ एक्सप्रेस या रेल्वेतून नागपूर येथून त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

 त्याला आर्थिक गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड यांच्याकडे पुढील कारवाई करिता सुपूर्त केले असून न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कस्टडीची रिमांड दिलेली आहे.


ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पदाचे

 सहाय्यक पोलीस निरीक्षक एच विमाने पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रविण तापकीर, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, विजय गंभीरे, सोपान ठोकळ, गणेश मेदगे, सुनिल चौधरी, मयुर दळवी, शाम बाबा, विजय तेलेवार, नितीन गेंगजे, शुभम कदम, राम मोहिते, ज्ञानेश्वर गिरी, तौसिफ शेख तसेच खंडणी विरोधी पथकाचे सुनिल कानगुडे व कडील नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *