👁 6 Views

पत्नीने पाय दाबून देण्यास नकार दिल्याने भडकला, रागात पतीचं राक्षसी कृत्य

 

बदलत्या काळानुसार बहुतेक पती-पत्नी अगदी बरोबरीने काम करून आपलं घर आणि संसार चालवतात. पण काही लोक असे आहेत जे आजही आपली मानसिकता आणि विचारसरणी बदलू शकलेले नाहीत.

याचाच प्रत्यय देणारी एक घटना बिहारच्या जहानाबादमधून समोर आली आहे. जिथे मखदुमपूरमध्ये एका पतीने पत्नीने पाय दाबण्यास नकार दिल्याने तिची हत्या केली.ही खळबळजनक घटना मखदुमपूर पोलीस स्टेशन हद्दीतील छकोरी बिघा गावातील आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पतीला अटक करून तुरुंगात टाकलं आहे.

मखदुमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छकोरी बिघा गावात राहणारा मुन्ना शर्मा याने गुरुवारी रात्री पत्नी रिंकी देवीला पाय दाबण्यास सांगितले होते. 


मात्र, पत्नीने आपली तब्येत ठीक नसल्याचं सांगत पाय दाबण्यास नकार दिला आणि हे ऐकून पतीला राग अनावर झाला. यानंतर पतीने रागात जे काही केलं ते हादरवणारं होतं. त्याने लाकडी दांडक्याने पत्नीच्या डोक्यात वार केला.


यातच पत्नीचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती मृत रिंकी कुमारीच्या माहेरकडच्यांना दिली. 


त्यानंतर रिंकी कुमारीचे वडील सुरेश सिंह यांनी मखदुमपूर पोलीस ठाण्यात आपल्या मुलीच्या हत्येची माहिती दिली. तत्परतेने कारवाई करत पोलीस घटनास्थळी पोहोचले.


तिथे मृत रिंकी कुमारीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपी पती मुन्ना शर्माला अटक केली.

 या संदर्भात मखदुमपूर पोलीस स्टेशनचे प्रमुख रवी भूषण यांनी सांगितलं की, मृत महिलेचे वडील सुरेश सिंह यांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 


आरोपी पती विक्षिप्त स्वभावाचा असून त्याच्यावर आधीपासूनच उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *