👁 6 Views

बघा हि स्टंटबाजी ! पत्नी मागे बसलेली असताना गाडी चालवता चालवता हा माणूस चक्क ….. व्हीडिओ व्हायरल

 

सोशल मिडियावर नेहमीच खूप वेगवेगळे रिल्स, व्हिडिओ बघायला मिळतात. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खरोखरच थक्क करून सोडणारे असतात.


सध्या व्हायरल झालेला हा एक व्हिडिओही असाच आहे. हा व्हिडिओ पाहून या माणसाला स्वत:च्या आणि स्वत:च्या बायकोच्या जीवाची काही पर्वा आहे की नाही, असा प्रश्न नेटिझन्स विचारत आहेत. त्याला कारणही तसंच आहे. कारण दुचाकी चालवताना त्याने जे काही केलंय ते पाहून अनेक जण हैराण झाले आहेत.


आपल्या शहरात आपण अशा प्रकारची तरुण मंडळी अनेक पाहतो. हे लोक एकतर आपल्याच धुंदीत सुसाट गाडी चालवत असतात. आजूबाजूचे लोक त्यांच्या गिणतीतही नसतात.


काही तरुण तर दुचाकी चालवताना वाटेल तसे प्रयोग करतात. कुणी झिकझॅक म्हणजे वेडीवाकडी करत गाडी पळवतं, तर कुणी चालत्या गाडीवर उभं राहतं. 


हात सोडून बाईक चालविणारेही भरपूर असतात काही जण वेगात असणाऱ्या गाडीचं करकचून ब्रेक दाबतात आणि मागचं चाक गोलाकार फिरवतात. तर काही जण पुढचं चाक उचलतात. व्हायरल झालेल्या या व्हिडिओतला हा व्यक्तीही अगदी तसाच.


इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ३ दिवसांपुर्वी शेअर झालेल्या या व्हिडिओला १ लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *