👁 11 Views

प्रियकराच्या पत्नीचा प्रेयसीकडून खून

 

राजगुरूनगर येथे प्रेयसीने प्रियकराच्या पत्नीचा खुन केल्याचा गुन्हा खेड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दोन दिवसात उघड केला.


कोमल गणेश केदारी (वय 28, रा. साई साम्राज्य राजगुरूनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या पतीची प्रेयसी स्वाती सुभाष रेंगडे


 (वय 21, रा. शेवंता पार्क सोसायटी, तिन्हेवाडी रोड, राजगुरूनगर) हिस खेड पोलिसांनी अटक केली आहे. 


तिला (दि. 24) तारखेपर्यंत कोठडीचे आदेश खेड न्यायालयाने दिले आहेत. याबाबत खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 16) कोमल गणेश केदारी हिचा पती कंपनीत कामाला गेल्यावर घरात ती एकटी होती.


कोमल हिचा गळा आवळून खून झाल्याबाबत गणेश केदारी यांनी खेड पोलीस ठाण्यात खबर दिली होती. खेड पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्हाचा वेगात तपास सुरू केला होता. कोणताही पुरावा नसताना खून कोणी केला? का केला? कोणत्या कारणाने केला? याबाबत पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.


पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभागचे सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेडचे पोलीस निरिक्षक विजयसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला.


या गुन्ह्यातील संशयित महिला स्वाती सुभाष रेंगडे हिस जुन्नर येथून मोबाईल लोकेशन व मोबाईल वरील मेसेज, फोन याच्या माध्यमातून तपास करून ताब्यात घेतले. विचारपूस केली असता तिने पहिल्यांदा उडवीउडवीची उत्तरे दिली. अधिक विश्‍वासात घेतल्याने तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. स्वातीस पोलिसांनी अटक केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *