👁 9 Views

दिरानेच केला भावजयीचा विनयभंग

 

नात्याला काळिमा फासणारी घटना जालन्यातील कोठारा गावात घडली. दिरानेच वहिनीवर बलात्कार केला. 


या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भोकरदन  पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.


विशेष म्हणजे पीडितेचा पती हा हरवलेला असून तिचा पती हरवल्याची मीसिंग तक्रार भोकरदन पोलीस ठाण्यात दाखल


 करण्यात आलेली आहे. काल रात्री उशिरा ही घटना घडली. 

पीडित महिलेचा पती हरवलेला असल्याने पीडितेचा दिर आणि पुतणी हे दररोज तिला सोबत म्हणून संध्याकाळी झोपण्यासाठी तिच्याकडे येत होते. 


दरम्‍यान रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पीडित महिलेच्या दिराने तिच्यावर बलात्कार केला. 


या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी दिरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला 

असून संशयीत आरोपी दिराला अटक केली आहे. या घटनेप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *