👁 6 Views

पत्नीचे अनैतिक संबंध ,पतीने कोयत्याने वार केले

 

मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथे अनैतिक संबंधातून कविता चंद्रकांत कोरवी (वय.२६) हीचा पती चंद्रकांत किसन कोरवी (वय.३५) याने पत्नीचा धारधार विळ्याने गळ्यावर, पोटावर आणि पाठीवर वार करून खून केला.


बुधवारी (दि.२३) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास सुतार पाणंद, बारबाहीच्या शेत परीसरात घडली असून आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.


घटनास्थळावरुन आणि शिरोली पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथे शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथील चंद्रकांत किसन कोरवी आणि त्याची पत्नी कविता चंद्रकांत कोरवी हे कुटुंब शेतमजुरी करण्यासाठी चार वर्षापासून भाड्याच्या खोलीत राहत आहेत. त्यांना एक १४ वर्षांचा आणि एक बारा वर्षांचा अशी दोन मुले असून मोठा मुलगा हा निमशिरगाव येथे आजीकडे राहतो. तर लहान मुलगा हा आई-वडिलांच्याकडे राहतो.


पत्नी कविताचे गावातील एका तरुणा सोबत अनैतिक संबंध होते असा संशय पती चंद्रकांत याला होता. याबाबत दोन वर्षांपूर्वी कविताला त्या व्यक्तीचे संबंध सोडून दे असे चंद्रकांत याने सांगितले होते. सहा महिन्यांपूर्वी सुद्धा जवळच्या आणि मौजे वडगाव मधील लोकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले होते. पती चंद्रकांत याने अनेकदा पत्नीकडे घटस्फोट मागितला होता. पण कविता घटस्फोट द्यायला तयार नव्हती.


कविताचे बाहेर तरुणाबरोबर संबंध होते असा वारंवार संशय चंद्रकांतला येत होता. बुधवारी सकाळी सात वाजता कविता शेतमजूरीसाठी अन्य महिलांच्या बरोबर बारबाही नावाच्या परिसरातील चौगुले यांच्या शेतात कामासाठी गेली होती. यावेळी संबंधित तरुण सुद्धा शेतात कामाला होता. 


हे चंद्रकांतला समजल्यावर दुपारी दीडच्या दरम्यान चंद्रकांत हा चौगुले यांच्या शेतात जाऊन पत्नीला घेऊन घरी येत होता. तुला कामाला जायच नाही, असं सांगितलं असताना कामावर का गेलीस असे विचारले आणि दोघांच्यात वाद झाला.

सुतार पाणंद येथे ते घरी येत असताना या ठिकाणी विहीरी शेजारी कविता बसली होती यावेळी चंद्रकांत याने धारधार विळ्याने, कविताच्या गळ्यावर, पोटावर आणि पाठीवर सपासप वार केले. कविता रक्ताच्या थारोळ्यात जाग्यावरच ठार झाली. चंद्रकांत याने आपल्या हातातील सायकल तेथेच टाकून थेट हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाला. यावेळी कविताच्या ओरडण्याचा आवाज अनेकांनी ऐकला.

 घटनास्थळी पोलिस उपाधिक्षक प्रिया पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजय गोरले यांनी भेट दिली. यानंतर आरोपी चंद्रकांत कोरवीला शिरोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी ताब्यात घेतले. या घटनेची नोंद रात्री उशिरा शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *