👁 5 Views

घरात येऊन गप्पा मारत चोरली सोन्याची बांगडी

 .

गणेश घुले (वय 35, रा. शिवाजी चौक, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि. 24) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश हा फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने फिर्यादींशी गप्पा मारताना त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी बघितली.


 ही सोन्याची बांगडी आहे का, असे म्हणून पाहण्यासाठी फिर्यादीच्या हातातील सोन्याची बांगडी घेतली. दरम्यान त्याने तहान लागली असल्याने पाणी आणण्याची विनंती केली.


 फिर्यादी महिला किचनमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या असता गणेश घरातून निघून गेला. त्यानंतर महिलेने गणेशला फोन केला. तो पाच मिनिटात परत आलो म्हणाला आणि त्याने फोन बंद केला.


त्यानंतर फिर्यादी महिला गणेशच्या घरी गेल्या असता तो घरी देखील भेटला नाही. 


त्यामुळे दहा दिवसानंतर याबाबत एक लाख 32 हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगडीचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *