👁 7 Views

बहिणीला शिवीगाळ करणाऱ्या मित्राची गुंडाने केली हत्या

 

अगोदरच पैशांमुळे वाद असलेल्या मित्राने बहिणीला शिवीगाळ केल्यामुळे संतापलेल्या गुंडाने त्याची भरदिवसा हत्या केली.


घटनेमुळे गड्डीगोदाम परिसरात खळबळ उडाली होती. प्रणय पात्रे (वय २३, बारा खोली, इंदोरा) असे मृताचे नाव असून, पोलिसांनी काही तासांतच आरोपी सत्येंद्र ऊर्फ लंबू बकरी पुरण यादव (२३, रा. झिंगाबाई टाकळी) याला अटक केली.


प्रणव पात्रे हा भंगार खरेदी व विक्रीचा व्यवसाय करत होता, तर सत्येंद्र हा दूध विक्रीचा व्यवसाय करतो.


 प्रणव आणि सत्येंद्र यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून मैत्री आहे. त्यांच्यात पैशांवरून वाद झाला होता. सत्येंद्रची बहीण पोलीस कर्मचारी आहे. 


प्रणयलाही ही गोष्ट माहीत होती. पैशांच्या वादावरून गुरुवारी सकाळी गड्डीगोदाम परिसरातील सेंट मायकेल शाळेजवळ दोघांमध्ये भांडण झाले.

 प्रणयने सत्येंद्रच्या बहिणीला उद्देशून अश्लील शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली व काही कळण्याच्या आतच सत्येंद्रने प्रणयच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार केले. वेदनेने कळवळत प्रणय खाली पडला. 


घटनेची माहिती मिळताच सदरचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रणयला दवाखान्यात नेले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *