👁 6 Views

सिंहगड मध्ये पायथॉन संबंधित विश्लेषणात्मक कार्यशाळा संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सोमवार  दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी  *पायथॉन* या विषयासंबंधी विश्लेषणात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.


 इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी प्रास्ताविक करताना सध्याच्या काळाची गरज म्हणून पायथॉन संबंधित माहिती दिली.


 नामांकित आय टी कंपनीमध्ये डेटा इंजिनिअर म्हणून कार्यरत असणारे सीमा डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना पायथॉन संबंधित 


मार्गदर्शन दिले. तसेच त्यांनी या तंत्राचा वापर करण्यासाठी वापरण्यात  येणाऱ्या सॉफ्टवेअर संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. दरम्यान कॉलेजचे प्राचार्य डॉ. के .जे. करांडे बोलताना म्हणाले की, शैक्षणिक सत्रांमध्ये सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी आणि भविष्यात कंपनीच्या गरजा ओळखून कायम अद्ययावत राहण्यासाठी विविध कल्पकतेला वाव देणाऱ्या वेबिनार व कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयामधे नेहमीच केले जाते. 


   या व्याख्याना मध्ये ६० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सीमा डोंगरे यांनी समर्पक उत्तरे दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 


 इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग विभागातील प्रा. नितीन खपाले सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली .या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी अवंतिका भोसले यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *