👁 4 Views

लग्नाचे आमिष दाखवून नेत्याचा महिलेवर अत्याचार

 

एका विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करत महिलेच्या पोटावर लाथ मारून गर्भ पाडणाऱ्या राजकीय


 पदाधिकाऱ्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बलात्कारासह इतर कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.


मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली.


जयकिशन उदकराम कांबळे (३१) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, त्याने पीडितेशी ओळख झाल्यानंतर बळजबरीने अत्याचार केले. 


तिच्या पतीलाही धमकावत ‘तिला सोडून दे, मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे.


 आमचे एकमेकांवर प्रेम आहे. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. तू तिला सोडले नाहीस तर तुला कायमचा संपवेन,’ 


असे म्हणून पीडितेच्या पतीलाच धमकी दिली. त्यामुळे पीडितेला पतीने सोडून दिले. त्यामुळे पीडिता आईच्या घरी राहू लागली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *