👁 5 Views

गतिमंद मुलीवर बळजबरीचा प्रयत्न,विनयभंगचा गुन्हा दाखल

 

आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण ताजे असतानाच आडगाव पोलिस ठाणे हद्दीत एका ७६ वर्षीय इसमाने गतिमंद मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मधुकर महादू सुर्यवंशी वय ७६ असे या संशयिताचे नाव आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की,पीडित चे कुटुंब हे आडगाव पोलिस ठाणे हद्दीत वास्तव्यास आहे.मोल मजुरी करून आपली गुजराण करतात.


सोमवार (ता.२८) रोजी पीडीतेची आई तिच्या लहान बहिणीस घेऊन भाच्याला लग्नाला जाण्यासाठी निघाल्या होत्या.त्यावेळी शेजारील काही नागरिकांनी फोन हून संपर्क साधला, तुमच्या गतिमंद मुली समवेत अपप्रकार घडल्याबाबत सांगितले.


 बाजूस राहत असलेल्या ७६ वर्षीय मधुकर सुर्यवंशी याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजले. 


त्यानुसार असा प्रकार अन्य कुणासोबत घडू नये, यासाठी आडगाव पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. संशयिताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *