👁 7 Views

बसमधील प्रवासी झोपेत असताना भरधाव ट्रक काळ बनून आला ! 6 ठार

 

उत्तर प्रदेश राज्यातील बहराईचमध्ये एक भीषण दुर्घटना  घडली.

एक भरधाव ट्रक रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रवासी बसला जोरात  धडकला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामध्ये बसमधील 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. 


तर 15 जण गंभीररीत्या जखमी झाले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे एकच खळबळ माजली होती.

नेमका कुणाच्या चुकीमुळे हा अपघात घडला, याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 


मात्र या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. समोरा समोर झालेल्या या धडकेत बस आणि ट्रकचं जबर नुकसान झालं. बसचा या अपघातात चेंदामेंदा झाला होता.


काही प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात किती भयंकर होता, याचा थरारक किस्साही सांगितला आहे. सकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास बहुतांश प्रवासी झोपेत होते.


 त्यावेळी जरवर या भागात एक ट्रक चुकीच्या दिशेने थेट बसच्या समोर आला आणि जोरात आदळला.


ही धडक इतकी जबरदस्त होती की झोपेत असलेल्या प्रवाशांना काही कळायच्या आतच अनर्थ घडला. काहींचा तर झोपेच प्राण गेला. तर काही जण गंभीररीत्या जखमी झाले. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या धडकेच्या आवाजाने प्रवाशांची झोपच उडाली. सगळेच धास्तावले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *