👁 5 Views

पत्नीचे शिर धडावेगळे केले, शिर हातात घेऊन मंदिरावर जाऊन बसला

 

पूर्णा तालुक्यातील कमलापूर येथे पतीने पत्नीचे शीर कोयत्याने तोडून धडावेगळे केल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही थरारक घटना घडली आहे.


सदर मयत महिला ही दोन मुली व एक मुलगा यासह कमलापूर येथील राहत होती. 


मंगळवारी (२९ नोव्‍हेंबर) रात्री अचानक नऊच्या दरम्यान आशा केशव मोरे (वय 36) यांचे पती केशव गोविंद मोरे याने रात्रीच्या ९च्या दरम्यान अचानक घरात येऊन कोयत्याने वार केले. 


या दरम्‍यान आशा मोरे यांचे शीर धडावेगळे करून ते शिर गावातील हनुमान मंदिराजवळ जाऊन ओट्यावर बसला होता.


केशव गोविंद मोरे हा काही महिन्यांपासून मनोरुग्ण असल्याचेही कळाले आहे. 

त्याने अनेक वेळा गावातील व गाव शेजारील अनेकांना त्रास दिला आह़े.


 या घटनेबद्दल ताडकळस पोलीस स्टेशन येथे व्‍यंकटी गोविंदराव मोरे यांनी फिर्यादी दिली असून गुन्‍हा दाखल केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *