महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती.
आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार होते.
नियुक्ती पत्र देण्याविरोधात तातडीची याचिका दाखल केलेल्या तीन EWS उमेदवारांना हायकोर्टाने दिलासा दिला.
सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास हायकोर्टाने स्थगिती दिली.
मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे संध्याकाळी तातडीची सुनावणी झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 जागा भरण्यात आल्या आहेत.
त्यापैकी 111 नियुक्त्यांवर हायकोर्टाने स्थगिती दिली. मात्र सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून हायकोर्टाच्या स्थगितीमुळे आता नियुक्तीपत्र देता येणार नाही.





