👁 9 Views

सोलापूर: तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पुण्यातील तरुणाविरोधात गुन्हा

 

सोलापूर : शहरातील धर्मवीर संभाजी तलावात एका तरुणीने आत्महत्या केली होती. 


याप्रकरणी पुणे येथील एका तरुणाविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


29 ऑक्टोबर रोजी एक पंचवीस वर्षीय तरुणीने शहरातील धर्मवीर संभाजी तलावात आत्महत्या केल्याची घटना घडली होती.


 त्यानंतर या घटनेचा तपास सुरू असताना आत्महत्या करणाऱ्या तरुणीची ओळख पटली.

तेव्हा मृत तरुणीच्या आईने सदर बझार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 


त्या तक्रारीनुसार, मृत तरुणी ही पुणे येथे नोकरी करीत होती. तेथे या तरुणीचा संबंध एका तरुणाशी आला. त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले.

मृत तरुणी ही पाच महिन्यांची गरोदर असताना संशयित तरुणाने लग्नास नकार दिला. या प्रकारातून तरुणीने तलावात उडी मारून आत्महत्या केली. 


यावरून संशयित स्वप्नील बंडे (रा. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस अधिकारी श्री. माळी करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *