👁 5 Views

मित्रानेच खुपसला मित्राच्या छातीत खंजीर

 

मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला जात मित्रानेच मित्राच्या छातीवर खंजीर खुपसून जखमी केल्याची घटना मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचगव्हाण (ता.


हदगाव) येथे घडली. जखमीवर नांदेड येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले असून पोलिस उपविभागीय अधिकारी शफकत आमना यांनी गुरूवारी (ता. एक डिसेंबर) घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


चिंचगव्हाण येथील गुणवंत बाबुराव दामोदर (वय २४) हा ता. २९ नोव्हेंबर रोजी गावालगत असलेल्या तळ्याच्या काठावर शेळ्या चारत होता.


 त्याचा मित्र ओंकार साहेबराव खरडे (वय २०) याचा मागील काही महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हाच वाद विकोपाला जाऊन ता. २९ नोव्हेंबर रोजी उफाळून आला.


गावालगत असलेल्या तळ्याच्या काठावर वादाने रुपांतर भांडणात होऊन त्यातील आरोपी ओंकार खरडे याने रागाच्या भरात गुणवंत दामोदर यांच्या छातीमध्ये खंजीर खुपसला असल्याची घटना घडली. सध्या जखमी गुणवंत दामोदर याच्यावर नांदेड येथील खासगी

 रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने आरोपी ओंकार खरडे हा फरार झाला आहे.


जखमी गुणवंत दामोदर यांचे वडील बाबुराव दामोदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनाठा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

 गुरूवारी (ता. एक) पोलिस उपविभागीय अधिकारी शफकत आमना यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनेचा तपास करण्यासाठी आवश्यक सुचना केल्या आहेत. सदर प्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक चिट्टेवार करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *