👁 5 Views

मंगळवेढा; शासकीय कार्यालये बनू लागली लुटीचा अड्डा , नागरिक त्रस्त

 

मंगळवेढा : 15 व्या वित्त आयोगातील कामाचे बिल काढण्यासाठी बक्षीस रूपाने लाच मागणाऱ्या बोराळेच्या ग्रामविकास अधिकाय्राला लाच लुचपत खात्याने पकडले एकूणात तालुक्यातील शासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना लाच रूपाने आर्थिक लूट करण्यासाठी चढाओढ लागल्याचे या निमित्ताने समोर आले.


तालुक्यामध्ये सध्या विविध योजनेच्या माध्यमातून आलेल्या निधीतून विकास कामे करताना सर्वाधिक लोकांची गर्दी पंचायत समिती, कृषी, महावितरण, जिल्हा परिषद बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा,सार्वजनिक बांधकाम तहसील कार्यालयातील नवीन पीएम किसान नोंदणी, पुरवठा विभागाकडे नवीन, विभक्त व दुबार शिधापत्रिका या कामाबरोबर गाव पातळीवर तलाठी,ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक, वायरमन यांच्याकडे सातत्याने कामाच्या निमित्ताने संबंध येतो परंतु अलीकडच्या काळात सातव्या वेतन आयोगानुसार या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मनासारखा पगार दिला.


असताना यापूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांनी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला मी माझ्या कामावर व पगारीवर समाधानी आहे असे फलक त्यांच्या कार्यालयात लावण्याचे आदेश दिले होते मात्र त्यांच्या आदेश त्यांच्या बदलीनंतर फक्त फलकावर राहिला मात्र सर्वसामान्य नागरिकासह जिल्हा परिषद बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा खात्याच्या कार्यालयाकडे ठेकेदारांनी केलेल्या कामाची देखील काढण्यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर या ठेकेदाराला होणारा त्रास हा सर्वश्रुत झाला.


पंचायत समितीत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे सध्या शासकीय कारभार हा अधिकाऱ्याच्या हातात असल्यामुळे त्यांची मनमानी वाढली आहे त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना लाचलुचपत पथकाचा आधार घ्यावा लागत आहे


 अशा टक्केवारी व लाच प्रकरणामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि हेच कर्मचारी त्यांच्या कामासाठी नागरिकांनाही वेठीस धरू लागले.

गावपातळीवरील हे कर्मचारी मुख्यालयात राहल्यास आर्थिक व्यवहार करणे अडचणीचे ठरते म्हणून मुख्यालयात न राहता तालुक्याच्या ठिकाणी राहून संबंधिताला तालुक्याच्या ठिकाणी बोलावून त्याच्याकडून आर्थिक व्यवहार झिरो कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करत असल्याची चर्चा या निमित्ताने समोर येऊ लागली. यापूर्वी मंडलाधिकारी, पुरवठा निरीक्षक, ग्रामसेवक,ग्रामसेविका,बांधकामचे अभियंता,मुख्याध्यापक या लाच प्रकरणाचे बळी ठरल्यामुळे अजूनही काही शासकीय कार्यालये लाचलुचपतच्या रडारवर असल्याची बोलले जात आहे.


दरम्यान आ. समाधान अवताडे यांनी लाच प्रकरणामुळे ज्याप्रमाणे तालुक्याची बदनामी होऊ लागली शासकीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र आढावा घेऊन सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना व ठेकेदारांना या कामासाठी त्रास न होईल या दृष्टीने सूचना द्याव्यात अशी मागणी होऊ लागली. 

एका बाजूला कामाच्या गुणवत्ता गुणवत्तेची अपेक्षा करायची दुसऱ्या बाजूला त्यांना टक्केवारीच्या रूपाने खेळायचे त्यामुळे गुणवत्तेचा प्रश्न देखील बाजूला राहिला.

बोराळे येथील ग्रामविकास अधिकारी गोपीचंद दादा गवळी (वय 56)याला 1 लाखापैकी पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता न्यायालाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान,आरोपीस चौकशीसाठी लाच लुचपतच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतल्याचे समजताच पं. समितीमधील जबाबदार अधिकार्‍यांनी कार्यालयातून पळ काढल्याची चर्चा ऐकावयास मिळाली

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *