👁 4 Views

मंदिरात चोरी करायला गेला चोर ; समोर देव दिसताच जे केलं ते पाहून चक्रावून जाल

 

चोरीची एक अजब घटना मध्य प्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यातील जैन मंदिरातून समोर आली आहे. इथे चोरी करण्यापूर्वी चोराने जे काही केलं, ते पाहून सगळेच थक्क झाले.


चोराने मंदिरात चोरी करण्याआधी हात जोडून देवाचा आशिर्वाद घेतला. यानंतर त्याने मंदिरातील अष्ठधातूच्या मूर्ती आणि दानपेटीचं कुलूप तोडून त्यातील दोन लाख रुपये लंपास केले. चोरीची ही घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जिल्ह्यातील परिहार ठाण्याच्या परिसरात पनिहार गावात एक प्रसिद्ध जैन मंदिर आहे.




एका चोराने या मंदिरातच डल्ला मारला. मात्र, चोरी करण्याआधी या चोराने जे काही केलं त्याचीच जास्त चर्चा रंगली आहे. या चोराने अष्ठधातूच्या मूर्ती आणि दानपेटीतील 2 लाख रुपये लंपास केले आहेत. मंदिरातील किमती सामान घेऊन तो चोर फरार झाला.

चोराने अवघ्या 10 मिनिटात मंदिरातील दानपेटीत असलेले 2 लाख रुपये चोरी केले. यासोबत तो अष्ठधातूच्या सहा मूर्तीही घेऊन गेला. सकाळी जेव्हा पुजारी पूजा करण्यासाठी मंदिरात गेले तेव्हा त्यांना दानपेटीचं कुलूप तुटलं असल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच मूर्त्याही गायब होत्या.


यानंतर मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. यामध्ये चोरीची संपूर्ण घटना कैद झालेली दिसली. 
घटनेची माहिती मिळताच परिहार ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या चोराला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लवकरच चोराला अटक केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *